25 June 2022 12:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
x

तुमच्या अँड्रॉईड मोबाईल'मधील तो ‘UIDAI’चा नंबर येणे ही गुगलची चूक

नवी दिल्ली : भारतातील करोडो अॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये काल अचानक ऑटोमेटेड पद्धतीने ‘UIDAI’चा टोल फ्री क्रमांक सेव झाला होता. त्यामुळे वायरस किंवा मोबाईल हॅक सारख्या अफवा पसरल्या होत्या. तसेच अनेकांनी त्यासाठी UIDAI’ खात्याला जवाबदार धरले होते, ज्यावर नंतर ‘आधार’ कडून अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती.

परंतु स्वतः गुगलने दिलेल्या जाहीर कबुलीत ती चूक गुगल’कडून झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. अॅन्ड्रॉईड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम हा गुगलच्या मालकीचा असून त्यामध्ये असं काही होत असेल तर त्याला स्वतः गुगलच जवाबदार असू शकत असं अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं होत, जे योग्य असल्याचं गुगलच्या निवेदनातून स्पष्ट झालं आहे.

नक्की काय म्हटलं आहे गुगलने त्यांच्या निवेदनात;

यूआयडीएआय सहित इतर ११२ हेल्पलाईन क्रमांक अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये २०१४ सालीचा कोड करण्यात आले होते. तो नंबर एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आला की मोबाईल डिव्हाईस बदलल्यानंतर सुद्धा हा नंबर पुन्हा नव्या डिव्हाईसमध्ये सेव होतो. परंतु लोकांना त्यांने त्रास झाला याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण देत गुगलने जाहीर माफीनामा दिला आहे. तसेच पुढे जाऊन असं सुद्धा म्हटलं आहे की तुम्ही तो नंबर डिलीट सुद्धा करू शकता.

हॅशटॅग्स

#Google Report(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x