14 December 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

VIDEO | Russia Perm University | रशियात विद्यापीठात गोळीबार, 8 जणांचा मृत्यू | विद्यार्थ्यांची धावपळ

Russia shooting at Perm State University

मॉस्को, २० सप्टेंबर | रशियाच्या एका विद्यापीठात एका बंदुकधारी व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात अंदाजे 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मॉस्कोपासून 1300 किलोमीटरवर असणाऱ्या पर्म स्टेट यूनिव्हर्सिटीत हा गोळीबार झाला. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थी विद्यापीठाच्या इमारतीच्या टेरसवर तर काही विद्यापीठांच्या सभागृहात लपले. हेच नाही तर जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीच्या खिडकीतून उड्या मारल्या. रशिया टुडे या स्थानिक माध्यम समुहाच्या माहितीनुसार या हल्ल्यात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले आहेत.

रशियात विद्यापीठात गोळीबार, 8 जणांचा मृत्यू | विद्यार्थ्यांची धावपळ – Russia at least eight dead several injured in shooting at Perm State University :

Russia shooting Gunman kills several at Perm University :

रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शूटर 18 वर्षांचा तिमुर बेकमानसुरोव (Timur Bekmansurov) आहे. ज्याला सुरक्षा रक्षकांनी गोळी मारली आणि त्याचाही जागेवरच मृत्यू झाला. रशियाच्या वेळेनुसार सकाळी 11 वाजेच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आला. अजून एका क्लिपमध्ये एक व्यक्ती शस्र घेऊन पर्म विद्यापीठात चालताना दिसतो आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Russia at least eight dead several injured in shooting at Perm State University.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x