नवी दिल्ली: तुम्हाला देशाचा प्रधानसेवक नेमका कसा हवा आहे? तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? असे प्रश्न उपस्थितांसमोर उपस्थित करत मोदींनी विरोधकांना आज लक्ष केलं आहे. विरोधकांना केंद्रात एक कमकुवत आणि कमजोर सरकार हवं आहे. त्यांना केवळ स्वत:ची दुकानं थाटण्यात रस आहे. आणि त्यामुळेच त्यांना केंद्रात दुबळं सरकार सत्तेवर हवं आहे, अशा कठोर शब्दांत पंतप्रधानांनी विरोधकांवर आजच्या पक्ष मेळाव्यात हल्लाबोल केला आहे.

भारतीय जनता पक्ष अतिशय वाईट परिस्थितीतून इथे पोहोचला आहे. आपण स्वतःहून भारतीय जनता पक्षाला मजबूत केलं आहे. कारण आपल्यावर संघटनेचं चांगले संस्कार नसते, तर आपण दुसऱ्यांच्या मधाळ बोलण्यात नक्की गुरपटलो असतो. भाजपच्या परंपरेमुळे, शिस्तीमुळे, लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यागातून भारतीय जनता पक्ष इथे आहे, असं पंतप्रधान म्हणाले. तुम्हाला देशाचा प्रधानसेवक नेमका कसा हवा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. ‘तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? की तुमच्या घरातल्या गोष्टी बाजूच्या घरात जाऊन सांगणारा प्रधान सेवक तुम्हाला हवा ?’, असे अनेक प्रश्न मोदींनी उपस्थितांपुढे मांडले.

दरम्यान, विरोधकांच्या महाआघाडीवर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. ‘जे पक्ष कधीकाळी काँग्रेसच्या विरोधात बोलायचे, तसेच ज्यांची विचारधाराच कधीकाळी काँग्रेसविरोधी होती, ते सर्व पक्ष आज एकत्र येत आहेत. हे सर्वकाही केवळ एका व्यक्तीविरोधात सुरू आहे,’ असा घणाघात यावेळी मोदींनी विरोधकांच्या आघाडीला लक्ष केलं आहे.

modi targets oppositions parties during speech at delhi