15 December 2024 8:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुझलॉन शेअर्स तेजीत असताना आली अजून एक महत्वाची बातमी, शेअरवर काय परिणाम?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एमएससीआयच्या ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये सामील होण्याच्या शक्यतेमुळे सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत आला आहे. एमएससीआय 14 नोव्हेंबर रोजी आपले सहामाही निर्देशांक पुनरावलोकनाचे निकाल जाहीर करणार आहे.

यामध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सामील होण्याची शक्यता आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.94 टक्के वाढीसह 42.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स सामील झाले तर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन होईल. जेएम फायनान्शिअल फर्मच्या अहवालानुसार सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये 186 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीसाठी आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे, या कंपनीचे शेअर्स जानेवारी 2024 मध्ये असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या मिडकॅप श्रेणीमध्ये सामील होणार आहे. AMFI अधिकृतपणे जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात याबाबत माहिती जाहीर करेल.

सुझलॉन एनर्जी कंपनीने मागील 8 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 463 टक्के नफा कमावून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.96 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 8 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.30 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक पातळीवर पोहचले होते.

अवघ्या आठ महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 463 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात आतपर्यंत या कंपनीचे शेअर्स 26 टक्के मजबूत झाले आहेत.

तांत्रिकदृष्ट्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 79 अंकावर ट्रेड करत आहेत. या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.7 आहे. म्हणजेच शेअरमध्ये अस्थिरता खूप जास्त आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. सध्या या कंपनीने 600 कोटी रुपये निव्वळ रोख सरप्लस राखून ठेवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 16 November 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x