10 May 2024 5:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 11 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार Rattanindia Power Share Price | शेअर प्राईस 11 रुपये! 4 दिवसात 20% परतावा दिला, तज्ज्ञांचा पेनी स्टॉक खरेदीचा सल्ला Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | चिल्लर गुंतवून शेअर्स खरेदी करा, गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स
x

IREDA IPO | आला रे आला IPO आला! शेअरची प्राईस फक्त 30 ते 32 रुपये, अल्पावधीत करेल मालामाल

IREDA IPO

IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. पुढील आठवड्यात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA कंपनीचा IPO लाँच होणार आहे. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30-32 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. IREDA Share Price

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 4 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे शेअर्स 1 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. 20 नोव्हेंबर 2023 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी आपले अँकर बुक ओपन करेल.

ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप होणार नाही, त्यांना 28 नोव्हेंबर 2023 रोजी पासून पैसे परत करण्यास सुरुवात होतील. 1 डिसेंबर 2023 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

IREDA कंपनी आपल्या IPO मध्ये 403.16 दशलक्ष फ्रेश शेअर्स गुंतवणुकीसाठी खुले करणार आहे. आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत भारत सरकार देखील आपले 268.78 दशलक्ष शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. अप्पर प्राइस बँडनुसार इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी आपल्या IPO द्वारे 1290 कोटी रुपये आणि OFS अंतर्गत 860 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

भारत सरकारने इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे एकूण 100 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ही भारत सरकारच्या मालकीची मिनीरत्न दर्जा प्राप्त कंपनी आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी ही कंपनी भारतातील अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA IPO GMP Today 16 November 2023.

हॅशटॅग्स

IREDA IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x