23 November 2019 8:12 AM
अँप डाउनलोड

काही लोकांनी भाड्याने पत्रकारीता करायला सुरूवात केली आहे: प्रियांका चतुर्वेदी

Aaditya Thackeray, Pappu, Shivsena, Anjana Om Kashyap, Priyanka Chaturvedi

मुंबई: आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या अँकर अंजना ओम कश्यप यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या टिप्पणीचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावेळी अँकरने काँग्रेसे नेते राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात तुलना करणारी धक्कादायक टिप्पणी केल्याचं या व्हिडीओ’मध्ये स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान सदर व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यापासून या महिला अँकरला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात असून टीकेचा देखील भडीमार सुरू आहे. त्यानंतर संबंधित वृत्त वाहिनीने हात झटकले आणि अँकरने त्याबाबत ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे पोहोचले होते. जेव्हा हे वृत्त चॅनलवर प्रसारीत करण्यात आलं त्यावेळी चॅनलमधील ‘पीसीआर’ टीमकडून अँकर अंजना ओम कश्यप यांचा माइक ऑन राहिला होता. मात्र, अंजना कश्यप यांना त्याबाबत कल्पना नसल्याने, चॅनलवर एकीकडे आदित्य ठाकरेंची दृष्य प्रसारीत होत असतानाच , “ये शिवसेना का राहुल गांधी साबित होगा, लिखकर रख लीजिए” असं विधान अंजना ओम कश्यप यांनी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय.

मात्र त्यानंतर संतापलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी नाव न घेता अंजना ओम कश्यप यांच्यावर सडकून टीकास्त्र सोडलं आहे. त्यावर त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे “कोण काय सिद्ध होईल हे येणारा काळ ठरवेल. मात्र काही लोकांनी तर भाड्याने पत्रकारीता करायला सुरूवात केली आहे. रस्त्यावरील पोपट देखील पैसे घेऊन भविष्यवाणी करतो’, अशा तिखट शब्दांमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी अंजना यांना चपराक दिली आहे.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(78)#Shivsena(756)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या