25 June 2022 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स PMGKAY | महागाईत गरीब कुटुंबांना मोदी सरकार धक्का देण्याची शक्यता | मोफत रेशन योजना बंद करण्याचा प्रस्ताव
x

भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईत, युतीचा निर्णय होणार?

BJP President Amit Shah, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, रविवारी मुंबईत येत असून, गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गोरेगावात होणाऱ्या सभेत शहा प्रचाराचा नारळ वाढवतील. आगामी विधानसभा निवडणुकीत काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयाचा मुद्दा भाजपने प्रचारात आणण्याचे ठरविले आहे. या मुद्द्याबरोबरच आणखी कुठले मुद्दे मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याच्या धाडसी निर्णयाबाबत राज्यातील – विशेषतः शहरी मतदारांवर चांगला प्रभाव आहे. त्याचा लाभ घेण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजप करेल, अशी चिन्हे आहेत.

या दौऱ्यादरम्यान अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भेटीत युतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच युतीचा फॉर्म्युला अंतिम झाल्यास आजच अमित शाह यांच्या उपस्थितीत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची आणखी एक मेगाभरती होणार आहे. या मेगाभरतीत रखडलेले पक्ष प्रवेश उरकले जाणार आहेत. मात्र नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या प्रवेशाचं नक्की काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

हॅशटॅग्स

#Amit Shah(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x