25 April 2024 11:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

गुप्तचर यंत्रणांचा इशारा! जैश-ए-मोहम्मद मोठा हल्ला करण्याच्या तयारीत

Narendra Modi, Guajarat, Pulawama Attack, Bharatiya Janata party

जम्मू : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने आधीपेक्षा देखील भयानक आत्मघाती हल्ला करण्याची मोठी योजना आखल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यानुसार १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखांची आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांमध्ये संभाषण झालं असून त्याआधारेच गुप्तचर यंत्रणांनी सदर इशारा दिला आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४० जवान शहीद झाले.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलाला अजून मोठं नुकसान पोहोचवण्यासाठी आणखी एका आत्मघाती हल्ल्याची योजना आखली आहे. संभाषणावरुन जम्मू किंवा जम्मू काश्मीरच्या बाहेर हा हल्ला केला जाऊ शकतो असा अंदाज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दर्शवला आहे.

प्रसार माध्यमांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तयारीचा व्हिडीओ जारी करणार आहे. या व्हिडीओमध्ये प्रामुख्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार अली अहमद दारवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. २० वर्षीय अली अहमद दार यानेच स्फोटकांनी भरलेली आपली व्हॅन सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात नेऊन धडक दिली होती. ज्यामध्ये भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या व्हिडीओचा आधार घेत जैश-ए-मोहम्मद काश्मीरमधील तरुणांना संघटनेत सामील करुन घेत आत्मघाती हल्ल्यांसाठी वापर करण्याची शक्यता आहे.

दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांमधील संभाषण हे जाणुनबुजून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. मात्र गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला असल्या कारणाने त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व काळजी घेत असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x