21 October 2019 4:13 PM
अँप डाउनलोड

मोबाइल-सोनसाखळी चोर निघाला शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा, स्थानिकांनी चांगलच झोडलं

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायक याला तेथील स्थानिक लोकांनी तुफान तुडवून चांगलाच राग व्यक्त केला. त्याला भर रस्त्यात मार दिल्यानंतर स्थानिक पोलिसांच्याही स्वाधीन केलं. दरम्यान, विनायक विरोधात याआधी ५० पेक्षा अधिक मोबाइल चोरी तसेच सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांच्या मुलाला म्हणजेच विनायकला अंमली पदार्थांचे प्रचंड व्यसन आहे. तसेच विनायक चोऱ्या करुन गांजा आणि ड्रग्ज विकत घेतो. सर्व व्यसनासाठी तो चोरलेले मोबाइल आणि सोनसाखळ्या विकतो, अशी माहिती अंधेरी पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली. दरम्यान, आजच त्याला एका व्यक्तीचा मोबाइल चोरताना स्थानिकांनी पाहिले आणि रंगेहात पकडले. त्यानंतर त्याला बेदम मार दिला आणि पोलिसांच्या हवाली करण्यात आले. याआधी त्याने ५० हुन अधिक मोबाइल आणि सोनसाखळ्या चोरल्याचे गुन्हे कबूल केले आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(451)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या