26 April 2024 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा
x

तेव्हा त्यांच्या कुटुंबात असा कुठलाही वाद दिसला नाही | पण पोलीस आपली कारवाई करतील - शर्मिला ठाकरे

Sharmila Thackeray

मुंबई, १६ ऑगस्ट | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. तसेच थेट पत्नीने आरोप केल्याने मनसेची मोठी राजकीय अडचण झाली आहे. त्यात गजानन काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयाबाहेर विविध पक्षातील महिला जमा झाल्या आहेत. गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र ४ दिवस उलटून देखील अटक झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र पोलिसांकडून आयुक्तालयाबाहेर जमावाला अडवले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. काळे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. गजानन काळे यांच्याकडून मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ होत असल्याचे पत्नी संजीवनी काळे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पोलीस आयुक्तांलयाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न महिलांनी केला. यावेळी त्यांना अडवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलीस आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. अखेर गृहमंत्र्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला भेटून परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर आता खुद्द दिलीप वळसे-पाटील यांनी गजानन काळेंना अटक करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे गजानन काळे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया:
गजानन काळे यांच्यावरील आरोपांबाबत राज ठाकरे याच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणावर टिप्पणी करायची नाही असं म्हटलंय. आपल्याला माहिती नाही त्यावर बोलण्यात अर्थ नाही, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

गजानन काळे प्रकरणात प्रश्न विचारला असता मला यावर टिप्पणी करायची नाही. आपल्याला माहिती नाही त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. गजानन काळे यांच्या आईचं निधन झालं त्यावेळी सांत्वनासाछी आम्ही गेलो होतो. तेव्हा कुटुंबात असा कुठलाही वाद दिसला नाही. प्रसारमाध्यमांनी टीव्हीवर बातमी दाखवल्यानंतर आश्चर्य वाटलं. याबाबत पोलीस आपली कारवाई करतील, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. दादरमध्ये केतकर बंधुंनी चालू केलेल्या पुण्यातील शौकीन पाट शॉपचं उद्घाटन शर्मिला ठाकरे यांनी केलं. त्यावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Sharmila Thackeray reaction on MNS Navi Mumbai city president Gajanan Kale case news updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x