27 July 2021 1:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

'राज' सेना धावली, पोलीस भरती निवाऱ्या विना उपाशी झोपणाऱ्या मुला-मुलीच्या मदतीला

नवी मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती चालू आहे. परंतु एक विदारक चित्र मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पाहावयास मिळत आहे आणि ते म्हणजे हीच दूर गावाकडून आलेली मुलं मुली शहरात कोणताच आधार नसल्याने उघड्यावरच रस्त्यावर उपाशी पोटी किंव्हा जास्त पैसे नसल्याने एखादा वडापाव खाऊन झोपत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परंतु प्रवासादरम्यान हे चित्र बघताना अधिक त्रास तेंव्हा होतो जेंव्हा तरुण मुली अंधाऱ्या रात्री उघड्यावरच रस्त्यावर कोणतीही तक्रार न करता झोपी जातात. विशेष करून शहर मुलींसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी किती भयानक आहेत ते वेगळं सांगायला नको. परंतु याच शहरातील पोलीस भरतीसाठी आलेल्या आणि उपाशी पोटी रस्त्यावर झोपणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे.

नवी मुंबई मध्ये पोलीस भरतीसाठी दूर गावाकडून आलेल्या या तरुण – तरुणींच्या राहण्याची आणि जेवण्याची समस्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोफत आणि स्वखर्चाने केली आहे. अनेक तरुण तरुणी त्यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्याचे आभार मानत आहेत. सरकार आमच्याकडे बघत नसलं तरी या शहरात आमच्या सारख्या गावाकडून आलेल्या गरीब मूला – मुलींकडे लक्ष देणारा राज ठाकरेंसारखा माणूस आमच्या सोबत आहे आहे याचा आम्हाला आनंद आहे अशी भावना ते व्यक्त करत आहेत.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x