4 February 2023 10:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा Mirae Asset Mutual Fund | मिरे अ‍ॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Oppo Reno 8T 5G | ओप्पो रेनो 8T 5G स्मार्टफोन भारतात लाँच, 108 MP कॅमेरा, किंमत आणि फीचर्स पहा Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर? Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर! या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट Post Office Scheme | या पोस्ट ऑफीस मासिक बचत योजनेचे व्याजदर वाढले, दरमहा 10650 व्याज मिळेल, स्कीम डिटेल
x

सध्या विरोध करणाऱ्यांना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती

Sharad Pawar, Narendra Modi, BJP, NCP

मुंबई : एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हल्लाबोल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी आता जशास तसे प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली असून, मंगळवारी मुंबईत झालेल्या जाहीर सभेत त्यांनी त्याचे पुन्हा प्रत्यंतर दिले. ‘राजकारणात विरोधात जाणाऱ्या शक्तींना दहशतवादी ठरविण्याची मोदी यांची नीती आहे’, असा थेट आरोप पवार यांनी केलाच पण, नेहरू, गांधी कुटुंबांनी देशासाठी काय केले, असा प्रश्न करणाऱ्या मोदींना या कुटुंबांनी केलेल्या कार्याची जंत्रीच वाचून दाखवली.

‘मागील ५ वर्षांत मोदी यांची हुकूमशाही पाहायला मिळत असून, ते महाराष्ट्रात आले आणि शरद पवार यांच्याबाबत बोलले नाहीत, असे सध्या होत नाही. आता मी मोदींच्या राजकीय अजेंड्याविरोधात भूमिका घेतल्याने ते माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत. आपल्याविरोधात बोलणाऱ्या शक्तींना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न मोदींकडून होत आहे’, असा आरोप पवार यांनी केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी महाआघाडीतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारार्थ खेतवाडीतील सभेत ते बोलत होते.

‘गांधी, नेहरू कुटुंबांवर मोदी यांचा हल्ला सुरू असून, त्यांनी देशासाठी काय केले असा प्रश्न मोदी विचारत आहेत. तथापि, स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी नेहरूंनी ११ वर्षे तुरुंगवास भोगला. नेहरूंनी दाखविलेला मार्ग चांगला असल्यामुळे भारतात हुकूमशाही आली नाही. राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कामगिरीची तर जगाने दखल घेतली आहे. राहुल गांधींच्या आजी आणि वडिलांनी तर देशासाठी बलिदान केले आहे’, असे पवार यांनी नमूद केले. ‘विकास हे लक्ष्य असल्याचे सांगणारे आता हिंदू धर्म धोक्यात असल्याचे बोलू लागले आहेत. काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाखाली राजकारण केले नाही असं देखील पवार म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1662)#Sharad Pawar(426)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x