11 August 2020 9:05 PM
अँप डाउनलोड

मोदींची मुलाखत म्हणजे चहाच्या पेल्यातले वादळ : उद्धव ठाकरे

मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले आणि मोदी हे केवळ बचावात्मक पवित्र्यात दिसले तसेच २०१९ ची चिंता त्यांच्या हावभावात स्पष्ट दिसत होती, अशा बोचरी टीका सामनामधून मोदींच्या मुलाखतीवर करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

२ दिवसांपूर्वीच मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. नेमका या मुलाखतीचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधानांना लक्ष केलं आहे. ‘मोदी यांनी एखादी पत्रकार परिषद घ्यावी आणि प्रश्नोत्तरे करावीत अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होती. त्या अनुषंगाने मोदींनी एकाच वृत्त वाहिनीस मुलाखत देऊन ती देशभर प्रसारित केली. दरम्यान, या मुलाखतीतून त्यांनी राममंदिर, नोटाबंदी, उद्याच्या सार्वत्रिक निवडणुका वगैरे विषयांवर भाष्य केले होते. परंतु, त्यातून सामान्यांचे आणि तसेच विरोधी पक्षांचे समाधान झाले नाही असंच त्यानंतरचं एकूण चित्र होतं. त्याचाच प्रत्यय आज शिवसेनेच्या टिकेवरून सुद्धा आला आहे.

राम मंदिराबाबत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण दिले असून यावरुन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला धारेवर धरले आहे. दरम्यान, ‘राम मंदिराबाबत मोदी पहिल्यांचा खरे बोलले. राममंदिर हा त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय कधीच नव्हता. प्रभू रामाच्या नावावर केवळ सत्ता मिळाली आणि कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. मोदींच्या बहुमताच्या सत्तेत राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, असा प्रतिप्रश्न अग्रलेखात करण्यात आला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1262)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x