ED राजकारण | भाजपाला हा धंदा खूप महागात जाईल | वड्डेटीवार यांचा इशारा
नगर, २६ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाला राज्यातील बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मला देखील येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भारतीय जनता पक्षाने पाडला आहे. परंतु , त्यांनी एक कायम लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे देखील लागतील,’ असा इशारा ओबीसी समाजाचे नेते, राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.
मागील महिन्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठविली होती. यानंतर त्यांच्या घरीदेखील छापे मारले होते. यामुळे आधीच केंद्र विरोधात राज्य सरकार असा कलगीतुरा रंगलेला असताना शुक्रवारी रात्री माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा भारतीय जनता पक्ष विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे.
एकनाथ खडसे यांनी अद्याप नोटीस मिळाली नाही, नोटीस मिळाल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा देताना भारतीय जनता पक्षाने ईडी काढली आता आम्ही सीडी काढू, असा इशारा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी भीती व्यक्त करून दाखवली आणि भाजपाला इशारा देखील दिला. भारतीय जनता पक्षाला हा धंदा खूप महागात जाईल असा इशाराही वड्डेटीवार यांनी दिला आहे.
News English Summary: The Bharatiya Janata Party wants to end the politics of the Bahujans in the state. Today, senior leader and former minister Eknath Khadse received an ED notice, I may also come tomorrow. The Bharatiya Janata Party has laid the groundwork for the politics of revenge. But, they should always remember that no one has brought the crown of power. Whatever grows, it will have bad consequences, ‘warned vijay wadettiwar, an OBC leader and state aid and rehabilitation minister.
News English Title: Minister Vijay Wadettiwar warned BJP over misuse of ED news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा