25 June 2022 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
x

सिडको भूखंड घोटाळ्यावरुन शिवसेनेकडून मुख्यमंत्री लक्ष

मुंबई : सामना मुखपत्रात सिडको भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आल आहे. सामना अग्रलेखात देवेन्द्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवल्याचे कागदोपत्री दिसून येत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वच्छ पारदर्शक कारभाराचे धडे देत एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्यावरुन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांनी घरी बसवलं होत याची आठवण सुद्धा करून देण्यात आली आहे.

देवेन्द्र फडणवीसांनी जसे एकनाथ खडसे यांना घरी बसवले होते. कारण होत स्वच्छ पारदर्शक कारभाराच, मग आता देवेद्र फडणवीसांना एकनाथ खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात सामील करून घ्यावं लागेल नाहीतर फडणवीसांना ‘स्वच्छ’ होऊन जनतेसमोर यावे लागेल, असा टोला लगावला आहे.

काही दिवसापूर्वी काँग्रेसने आरोप केला होता की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सहमतीने राज्य सरकारचा हा १७६७ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे’. राज्यात कोयना धरणग्रस्तांच्या नावाने मंजूर केलेली २४ एकर जमीन राजकीय वरदहस्ताने बिल्डरच्या घशात घातली गेल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

त्यामुळे विरोधकांच्या आरोपाचा शिवसेना सुद्धा फायदा उचलत असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता काँग्रेस सोबतच मित्रपक्ष शिवसेनेला सुद्धा काय उत्तर देणार ते पाहावे लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x