8 December 2021 6:55 PM
अँप डाउनलोड

पुढची ५ वर्षे आपणच मुख्यमंत्री: कुमारस्वामी

बेंगळुरू : मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्याबाबत काँग्रेस बरोबर कोणताही समझोता झाला नसून संपूर्ण कार्यकाळ आपणच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचे कुमारस्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केला आहे. काही दिवस मुख्यमंत्री पदाबाबत ३०-३० महिने हे पद वाटून घेण्याचा दोन्ही पक्षात समझोता झाल्याच्या बातम्या येत असल्याने कुमारस्वामीना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलं.

जेडीएस आणि काँग्रेसमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी २०-१३ चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. जेडीएसचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे २० तर जेडीएसचे १३ मंत्री असतील असं निश्चित झालं आहे.

परंतु कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पडासोबतच महत्वाचं अर्थमंत्रालय सुद्धा स्वतःकडेच ठेवणार आहेत. करारानुसार काँग्रेसचे जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री पदी विराजमान होतील. येत्या बुधवारी कुमारस्वामी यांचा शपथविधी पार पडणार आहे.

हॅशटॅग्स

#Congress(526)#Narendra Modi(1657)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x