14 November 2019 1:07 PM
अँप डाउनलोड

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने नागरिक हैराण

मुंबई : देशभरात पुन्हां पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा दरवाढ झाली असल्याने वाहनमालक पुरते हैराण झाले आहेत. देशभरात पेट्रोलचा दर ३३ पैशाने तर डिझेलचा दर २६ पैशाने वाढला आहे. वाढलेल्या दराप्रमाणे पेट्रोलचा नवीन दर ८४.०७ रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे. पेट्रोल – डिझेलच्या विक्रमी दरवाढीने हा आजवरचा सर्वात मोठा उच्चांक ठरला आहे.

देशभरातील सर्व सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी ही दरवाढ अंमलात आणली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सलग ४ आठवड्यापासून तेलाचे दर वाढत आहेत त्यामुळे ही वाढ सर्वसामान्यांच्या माथी मारून नुकसान भरून काढलं जात आहे. देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहिल्यास मुंबईत सर्वाधिक महाग पेट्रोल असून, सर्वात स्वस्त दर पणजी मध्ये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ८४.०७ रुपये प्रति लिटर एवढा तर पणजीमध्ये आजचा पेट्रोलचा दर ७०.२६ रुपये प्रति लिटर एवढा आहे.

मुळात हे दर आधीच वाढणार होते. परंतु कर्नाटकच्या निवडणूक लागल्याने केंद्र सरकारच्या दबावामुळे पेट्रोल कंपन्यांनी भाव वाढ केली नव्हती. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने साहजिकच महागाईत सुद्धा वाढ होते आणि त्याचा फटका निवडणुकीत बसू नये म्ह्णून पेट्रोल कंपन्या सरकारच्या दबावाखाली दर वाढ लांबवत होत्या असं राजकीय जाणकार म्हणतात. निवडणूक संपताच पेट्रोल कंपन्यांनी सलग सलग सातव्या दिवशी पेट्रोल डिझेल दरवाढ केली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या