7 May 2021 10:26 PM
अँप डाउनलोड

शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो : शरद पवार

जळगाव : सध्याच्या सरकारला पिकविणाऱ्यापेक्षा खाणार्यांचीच अधिक चिंता आहे. राज्यकर्त्यांनी ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. जर शेतकरीच उध्वस्त झाला तर जस ५० वर्षांपूर्वी बाहेरच्या देशातून ‘लाल मिलो’ आयात करून खावी लागत होती ती वेळ आपल्यावर येईल, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी केंद्र तसेच राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जळगाव येथे जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च तंत्र पुरस्कार नाशिकच्या अविनाश पाटोळे आणि रश्मी पाटोळे दाम्पत्याला देण्यात आला त्या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या विषयावरून सरकारवर जोरदार टीका केली.

उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला तो असा की, एका नेत्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करणेवाले की बात (म्हणजे शेतकरी) करते हो लेकिन लाखो खानेवाले है उनके बारेमे…..त्यावर मी म्हणालो, बरोबर आहे. जर पिकविणाराच उद्ध्वस्त झाला तर खाणार काय ? शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो आणि त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे गरजेचे असल्याचे पवारांनी मत मांडले.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(381)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x