23 September 2021 2:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

बंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप

Rain Update

नवी मुंबई, १९ जुलै | मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे तीन दुर्घटना समोर आल्या आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दुसरीकडे, नवी मुंबईतील खारघरमधील हे पर्यटक आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सर्व पर्यटक खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकासाठी गेले होते. मात्र पावसामुळे डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे हे सर्व पर्यटक धबधब्याजवळ अडकले होते.

यामध्ये 78 महिला , 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांना लेडरच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. रविवार असल्याने खारघरमधील डोंगराळ भागात पर्यटकांनी गर्दी केली होती. बंदीचे आदेश असतानाही पर्यटक अशा ठिकाणांवर गर्दी करत आहेत. बंदी आदेश झुगारून पर्यटक डोंगराळ भागात गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरातून वाहणारा ओढा दुतर्फी भरून वाहू लागल्याने, पर्यटक धबधब्यावर अडकले. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास खारघर अग्निशमन जवानांनी जवळपास 116 पर्यटकांना ओढ्यावर सीडी लावून सुखरूप बाहेर काढले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Heavy rain 116 tourists stranded on a waterfall near Navi Mumbai rescued by fire brigade news updates.

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x