केडीएमसी'त कोरोना टेस्ट लॅबची उभारणी होणार; मनसे आ. राजू पाटलांच्या प्रयत्नांना यश
कल्याण-डोंबिवली, २३ एप्रिल: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील अनेक रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशातील एकूण १६ खासगी लॅबना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली होती. यामध्ये दिल्लीतील डॉ. लाल पॅथलॅब्स, डॉ. डॅंग लॅब, इंद्रप्रस्थ अपोलो यांचा समावेश आहे. आयसीएमआरने रविवारी सहा तर सोमवारी दहा पॅथॅलॉजी लॅब्सना कोरोना विषाणू शोध चाचणी सुरू करण्याला मंजुरी दिली होती.
तत्पूर्वी मुंबई महानगर पालिका कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. या सुविधेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या संशयिताच्या तपासणीचे नमुने घरी जाऊन घेतले जातील असं स्पष्ट केलं होतं. हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करुन कोरोनाच्या चाचणीसंदर्भात बुकींग केल्यानंतर खासगी लॅबचा प्रतिनिधी घरी येऊन नमुने घेऊन जाईल, अशी सेवा पुरवण्यात येणार होती.
मात्र कल्याण-डोंबिवलीतील लोकसंख्येचा विचार केल्यास आणि मागील काही दिवसात कोरोना संबंधित घडलेली प्रकरणं लक्षात घेता केडीएमसी हद्दीत देखील कोरोना संबंधित चाचणी करण्यासाठी खाजगी लॅबची गरज असल्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी पत्र देखील लिहिलं होतं. त्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मागणी मान्य केलं असून जिल्हा नियोजन योजने मार्फत या लॅबची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
#KDMC त #coronavirus बाधितांची संख्या वाढताना असतानाच इथे कोरोना टेस्टींग लॅब असणे आवश्यक आहे अशी मागणी मी २९ मार्च रोजी केली होती. जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी मान्य केलं असून जिल्हा नियोजन योजने मार्फत या लॅबची उभारणी करण्यात येणार आहे.त्यांचे व पालकमंत्र्यांचे आभार. pic.twitter.com/OJX05fFIPu
— Raju Patil (@rajupatilmanase) April 23, 2020
News English Summary: Considering the population of Kalyan-Dombivali and the corona related incidents that have taken place in the last few days, MNS MLA Raju Patil has demanded to Chief Minister Uddhav Thackeray that there is a need for a private lab to test corona in KDMC limits as well. MLA Raju Patil had also written a letter to Chief Minister Uddhav Thackeray in this regard. Those efforts have finally paid off. District Collector Rajesh Narvekar has agreed to the demand and MLA Raju Patil has informed that the lab will be set up through district planning scheme.
News English Title: Story Corona crisis MNS kalyan Gramin MLA Raju Patil requested CM Uddhav Thackeray for Covid 19 Test lab at Kalyan Dombivli News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News