२०२०-२१ आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास दर ०.८ टक्के राहील - फिच रेटिंगचा अंदाज
नवी दिल्ली, २३ एप्रिल: करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे. भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते. जागतिक मंदीचे स्वरुप आणखी गंभीर होणार असल्याचा फिचचा अंदाज आहे. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ०.७ टक्क्यांनी वाढेल असं देखील म्हटलं आहे.
दरम्यान, मार्च महिन्यामध्ये झालेल्या देशाच्या आयात-निर्यात व्यापाराची अधिकृत आकडेवारी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये मार्च महिन्यात निर्यात २१.४१ अब्ज डॉलर झाल्याचे स्पष्ट केले आहे. मागील वर्षाच्या मार्च महिन्याशी तुलना करता निर्यातीमध्ये ३४.५७ टक्के घट झाली आहे. त्यामुळे सन २०१९-२० या आर्थिक वर्षामधील निर्यात ३१४.३१ अब्ज डॉलर झाली आहे. मार्च महिन्यात ३१.१६ अब्ज डॉलरची आयात झाली असून घसरणीचे हे प्रमाण २८.१५ टक्के आहे.
केंद्राने देखील सध्या मोठी आर्थिक बचत करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना एक जानेवारी २०२० पासून देय असलेला महागाई भत्ता सध्या देण्यात येणार नसल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.
News English Summary: The corona virus has already found the economy in crisis. Now, Fitch rating, an international credit rating agency, has raised concerns. Fitch has further downgraded India’s growth rate for the fiscal year 2020-21.
News English Title: Story Fitch Rating Slashes India Growth Forecast Yet Again Pegs It At 0 8 For FY21 Dmp 82 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News