3 February 2023 6:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय?
x

प्रतापगडावरच छत्रपतींचा अपमान | औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलेलं, तसेच शिंदेंनादेखील डांबून ठेवलेलं - मंगलप्रभात लोढा

Mangal Prabhat Lodha

Minister Mangal Prabhat Lodha | छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या वादाची धग अद्याप कायम असून, त्यात आता नव्या विधानाची भर पडली आहे. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेशी करत उद्धव ठाकरेंना व्हिलन ठरवलं आहे.

कोश्यारी ते भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. भाजपचे उदयनराजे भोसले यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं टाळण्याचं आवाहन केलेलं असताना आता मंगलप्रभात लोढांनी केलेल्या विधानाने वादात आणखी भर टाकलीये.

राज्याचं लक्ष वेधणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमातच आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. प्रतापगड किल्ल्यावर आज 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे.

प्रतापगडावरच छत्रपतींचा अपमान
भाषणादरम्यान मंगलप्रभात लोढा म्हणाले, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले.. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: State Environment minister Mangal Prabhat Lodha made controversial statement check details on 30 November 2022.

हॅशटॅग्स

#Mangal Prabhat Lodha(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x