29 April 2024 2:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

उर्मिला धर्मवेड्या भाजप-सेनेची निवड करणार की हिंदू-मुस्लिम अशी फूट न पाडणाऱ्या मनसेची?

MNS, Shivsena, BJP, Urmila Matondkar, Uddhav Thackeray, Raj Thackeray

मुंबई : लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर मिळाल्याचे वृत्त आहे. मागील काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसच्या अंतर्गत गटबाजीवरून प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे.

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून उर्मिला मातोंडकर या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मातोंडकर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपाल शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान गोपाल शेट्टी यांनी मातोंडकर यांचा दारूण पराभव करत विजय प्राप्त केला होता.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उर्मिला मातोंडकर पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. इतकेच नव्हे तर मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना एक लेखी पत्र देखील पाठवले होते. दरम्यान ते पत्र सार्वजनिक झाले. खासगी पत्र सार्वजनिक झाल्याने मातोंडकर चांगल्याच भडकल्या होत्या. मातोंडकर यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांना पाठवलेल्या त्या पत्रात आपल्या लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमुळेच आपला पराभव झाल्याचं म्हंटले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनेने धर्माच्या राजकारणाला महत्व देत उर्मिला वयक्तीक आयुष्यात डोकावून उर्मिलाचे पती मोहसेन अख्तर मिर यांच्या मुस्लिम धर्मावरून त्यांना लक्ष केले होते आणि त्यासंबंधित विविध फोटोशॉप देखील जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले होते. त्यावर उर्मिला मातोंडकर यांनी देखील तीव्र शब्दात प्रतिउत्तर देत भाजप सेनेच्या समर्थकांची तोंडं बंद केली होती. मात्र आज त्याच उर्मिला मातोंडकर काँग्रेसवर नाराज होताच भाजप आणि शिवसेनेने त्यांना स्वतःच्या पक्षात ओढण्यासाठी गळ घातल्याचे समजते, मात्र उर्मिला मातोंडकर स्वाभिमान दाखवणार की केवळ राजकीय फायदा बघत या दोन पक्षांपैकी एकाची निवड करणार ते पाहावं लागणार आहे

काही महिन्यांपूर्वी काश्मीर स्थित व्यावसायिक आणि मॉडेल मोहसेन अख्तर मिर याच्यासोबत उर्मिलाने लग्नगाठ बांधली होती. उर्मिलाच्या विवाह बाबतीत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. एका हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभात अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला होता. त्यावेळी विवाह सोहळा हा कोणताही तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीत व्हावा असा आम्ही दोघांनी आणि कुटुंबियांनी ठरविले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उर्मिलाच्या खाजगी आयुष्यात डोकावून भाजप आणि शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या मुस्लिम पतीच्या धर्माच्या आधारे लक्ष केलं होतं. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील ऑफर आल्याचे वृत्त असून त्या धर्मवेड्या भाजप-शिवसेनेची निवड करणार की धर्माच्या आधारे लोकांमध्ये हिंदू मुस्लिम अशी फूट न पडणाऱ्या मनसेची ते पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x