मुंबई : नाणार ग्रामस्थांची भूमिका जर विरोधाची असेल तर शिवसेनेची भूमिका सुध्दा विरोधाचीच असेल आणि आमच्या पक्षाचाही नाणार प्रकल्पाला ठाम विरोध आहे असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या झालेल्या भेटीत नाणार प्रकल्पावर चर्चा झाली. त्यानंतर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात नाणार प्रकल्पाचा ‘एमओयू’ होणार नसून तसे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
नाणार प्रकल्पबाधित ग्रामस्थांसोबत आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या भेटी दरम्यान पक्षातील इतर नेते ही उपस्थित होते.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, नाणार ग्रामस्थांची भूमिका जर विरोधाची असेल तर शिवसेनेची भूमिका सुध्दा विरोधाचीच असेल आणि आमच्या पक्षाचाही नाणार प्रकल्पाला ठाम विरोध आहे असे ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांना म्हणाले.
