19 October 2021 8:12 AM
अँप डाउनलोड

बीएमसी स्थायी समितीमध्ये शिवसेनेत मोठे बदल ?

मुंबई : शिवसेनेचे अनुभवी नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे घेतल्यानंतर बीएमसी स्थायी समितीमध्ये शिवसेनेत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्या फेरबदलांची अंमलबजावणी लगेचच अमलात आणायची असल्यानेच शिवसेनेचे अनुभवी नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे घेण्यात आले. पुढे हेच बदल बीएमसी स्थायी समितीमधील इतर समित्यांमध्येही पहायला मिळू शकतात.

प्रश्न हाच उपस्थित केला जात आहे की फेरबदलांत इतक्या अनुभवी नगरसेवकांना डावलण्यात तर येणार नाही ना अशी भीतीही दबक्या आवाजात व्यक्तं होत आहे. तसेच नुकत्याच मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना जर तिथे संधी दिली गेल्यास शिवसेनेत पुन्हां नाराजांचीं संख्या वाढू शकते.

बीएमसी स्थायी समितीमध्ये पक्षप्रमुख नक्की काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष्य आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1150)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x