22 January 2022 5:39 AM
अँप डाउनलोड

शाहिद कपूरचा नवा लूक, लवकरच चाहत्यांच्या भेटीला.

पद्मावत चित्रपटातील हटके लूक नंतर शाहिद कपूरचा नवा हटके लूक प्रेक्षकांच्या भेटीला. शाहिद सध्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्याचे समजते आणि चित्रपटाची शूटिंग सध्या उत्तराखंड मध्ये सुरु आहे.

शाहिदने स्वतःच याची माहिती आपल्या चाहत्यांसाठी सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केली आहे. त्याने ‘बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटाच्या सेटवरील त्याचा नवा लूक शेअर केला आहे.

पद्मावत चित्रपटात शाहिदने राजाची भूमिका साकारली होती. आता तो नव्या लूक मध्ये असून सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर भरपूर हिट्स मिळत आहेत. इन्स्टाग्रामवर शाहिदने शेअर केलेल्या फोटोत बाईकवर बसला असून त्याने ब्लॅक कलरचे जॅकेट परिधान केले आहे. त्यात तो एकदम हँडसम दिसत आहे.

Day 1. On set. Batti Gul meter Chalu.Here we go. #goodpeople #goodvibes

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

हॅशटॅग्स

#Shahid Kapoor(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x