8 December 2021 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Man Infraconstruction Ltd | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील या स्मॉलकॅप स्टॉकने 300 टक्के रिटर्न दिला | वाचा सविस्तर Gen Bipin Rawat Chopper Crash | हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा मृत्यू Mastek Ltd | आशिष कचोलियांच्या पोर्टफोलिओतील हा मल्टीबॅगर स्टॉक नवीन ब्रेकआउटसाठी तयार | तुमच्याकडे आहे? Indo Count Industries Ltd | या स्टॉकमध्ये 1 वर्षात 40 टक्के रिटर्नची संधी | ICICI ब्रोकरेजचा खरेदी कॉल Closing Bell | शेअर बाजारात तेजी | सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची उसळी | निफ्टीही प्रचंड वाढला India GDP Fitch Forecast | फिच रेटिंगने भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज कमी केला Bharti Airtel Ltd | या स्टॉकमध्ये 22 टक्के रिटर्नचे संकेत | ब्रोकरेजचा खरेदीचा कॉल
x

मलाही आत्महत्या करावीशी वाटते | मग त्याला जबाबदार कोण असेल - रिया चक्रवर्ती

Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput

मुंबई, २८ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. सीबीआयच्या तपासातून दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गेल्या आठवडाभरात सीबीआयनं सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीसह कूक नीरजची अनेकदा चौकशी केली आहे. मात्र अद्याप सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. या प्रकरणात होणाऱ्या आरोपांवर रियानं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. सध्या निर्माण झालेली परिस्थिती मलाही आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं रियानं म्हटलं आहे.

सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यप्रकरणात आता नार्कोटिक्स हा नवीन मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणीदेखील रियावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या आरोपांविषयी तिला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर बोलत असताना एक बंदूक आणा आणि मला मारून टाका असं ती म्हणाली आहे.

“हो. आता हे इतकंच बाकी होतं. एक काम करा मला आणि माझ्या कुटुंबाला एका रांगेत उभं करा आणि गोळ्या झाडून आमची हत्या करा. नाही तर आम्हीच आत्महत्या करतो, आता मला खरंच असं वाटायला लागलंय. मी हे सगळे आरोप फेटाळून लावते. कोणताही आधार नसताना हे आरोप करण्यात आले आहेत”, असं रिया म्हणाली.

दरम्यान, रियावर मुलाखतीत बोलताना सांगितले की, ‘मी पॅरिसला एका कंपनीच्या शुटिंगसाठी गेले होते. क्लोदिंग कंपनी असलेल्या शीनने एक फॅशन शो केला होता. माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं होतं. यांसदर्भातील सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. त्या फॅशन शोमध्ये भाग घेण्यासाठीच मला पॅरिसला बोलवण्यात आलं होतं. माझे तिकिट्स बिजनेस क्लाससाठी बुक करण्यात आले होते आणि मला राहण्यासाठी एक हॉटेलही बुक करण्यात आलं होतं.’

रिया यासंदर्भात बोलताना म्हणाली की, ‘मी पॅरिसला जाणार असल्याचं सुशांतला जेव्हा समजलं तेव्हा सुशांतने विचार केला की, आपण युरोप टूर केली पाहिजे. मी कधीच सुशांतच्या पैशांचा वापर केला नाही. तर मी आणि सुशांत पार्टनर म्हणून एकमेकांसोबत राहत होतो.’ अभिनेत्री रियाने तिच्यावर युरोप टूरवरून करण्यात येणारे सर्व आरोप चुकीचे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत.

 

News English Summary: Rhea Chakraborty says that her family’s reputation has been tarnished in such a manner in the Sushant Singh Rajput death case that they have thought of ending their lives multiple times. In an interview with Aaj Tak, the actress said that she comes from a middle class family who value respect in society the most.

News English Title: Rhea Chakraborty Said I Also Want To Commit Suicide Sushant Singh Rajput News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x