20 May 2022 9:34 AM
अँप डाउनलोड

मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ११ हजार कोटींचा घोटाळा.

मुंबई : मुंबई मधील ब्रीच कँडी येथील शाखेत हा गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. पंजाब नॅशनल बँकेने सांगितल्याप्रमाणे काही खातेदारांच्या संगनमतानेच अंदाजे ११,३७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समजते. तसा गैरव्यवहार झाल्याचे बँकेने मुंबई स्टॉक एक्सचेंजला पत्राद्वारे कळवले आहे.

त्याच शाखेतील काही खातेदारांच्या संगनमतानेच अंदाजे ११,३७५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे पंजाब नॅशनल बँकेने सांगितलं. काही व्यवहार अनधिकृत पणे आणि संशयास्पद असल्याचे बँक प्रशासनाला निदर्शनास आल्याने ही माहित उघड झाली आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या प्रशासनाने याची रीतसर तक्रार केली असून, ही बातमी बाजारात पसरताच पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण व्हायला झाली आहे. आमच्या ग्राहकांना स्वच्छ आणि पारदर्शक सेवेसाठी आमची बँक कटिबध्द असल्याचे पंजाब नॅशनल बँकेने माध्यमांना कळविले आहे.

हॅशटॅग्स

#Punjab National Bank Scam(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x