11 July 2020 12:59 PM
अँप डाउनलोड

इस्राईलच्या पंतप्रधानांवर भ्रष्टाचाराचे आरोप, खटल्याची शिफारस.

जेरुसलेम : इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खुद्द इस्राईल पोलिसांनीच तशी शिफारस अॅटर्नी जनरल याच्या कडे केली असून पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात खटला चालवू देण्याची विनंती केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

इस्राईल पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या विरोधात खटला चालविण्याची शिफारस केली असून ती अॅटर्नी जनरल यांच्याकडे आता अंतिम टप्यात आहे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या प्रतिक्रीयेनुसार नेतान्याहू राजीनामा देणार नसून ते पदावर कायम राहतील असे म्हटले आहे.

त्यांच्या विरोधातील दोन भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातील एका प्रकरणात त्यांनी इस्राईल मधील एका वृत्तपत्राला सरकारच्या बाजूने सकारात्मक बातमी छापून आणण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तर दुसऱ्या एका प्रकारणात पदावर असताना सिगारेट, शॅम्पेन, ज्वेलरी सारख्या महागड्या भेट वस्तू स्वीकारण्याचा आरोप आहे. त्यांनी तब्बल २ लाख डॉलर किमतीच्या भेटवस्तू स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. त्या संदर्भातील पुरावेही सापडल्याचा दावा इस्राईल पोलिसांनी केला असून त्यांची या प्रकरणात ७ वेळा चौकशीही केली होती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Israel PM Netanyahu(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x