13 December 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

चिनी लष्कराला अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून थेट युद्धांच्या तयारीचे आदेश

China, President Xi Jinping, war increase military training

बीजींग, २७ मे: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी युद्धाची तयारी करावी, सैनिकांचे प्रशिक्षण वाढवावे. कुठल्याही परिस्थितीचा त्वरीत आणि प्रभावीपणे सामना करण्याची तयारी ठेवावी असे आदेश सैन्याला दिले आहेत. तसेच देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाच्या हितांचे रक्षण करावे, अशा सूचना सैन्याला दिल्या आहेत. सेंट्रल मिलिट्री कमिशनच्या बैठकीत बोलतांना त्यानी या सूचना केल्या.

सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, शी यांनी सैन्यदलाला सांगितले की, सर्वात वाईट परिस्थितीची कल्पना करा, त्याबद्दल विचार करा आणि युद्धाची सज्जता व प्रशिक्षण वाढविण्यावर भर द्या, सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितींचा त्वरित व प्रभावीपणे सामना करण्याची तयारी ठेवा. त्याचवेळी राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे हितांचंही संरक्षण करा. भारत आणि चीन यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) जवळपास २० दिवसांपासून तणावाची परिस्थिती आहे.

एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीन कोणासमोर बधणार नाही, हे दाखवून देण्यासाठी जिनपिंग यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. कोरोना व्हायरच्या संकटामुळे चीन एकाकी पडल्याचे चित्र आहे. कारण कोरोना व्हायरसच्या साथीची सुरुवात वुहान शहरातून झाली आणि चीनने हे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.

अमेरिका आणि भारताशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावरून चीनचा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासोबतचा तणाव वाढत चालला आहे. सर्वाधिक बिकट स्थिती निर्माण झाल्याची कल्पना करून त्यानुसार विचार करावा आणि युद्धाची तयारी करावी. करोनाच्या संकटातही प्रशिक्षणाचे नवे मार्ग देशाच्या सशस्त्र दलांनी शोधायला हवेत, असे शी जिनपिंग म्हणाले.

लडाखमध्ये चीनची लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. भारतीय सीमेवरील वाढता तणाव पाहता लडाखमध्ये चीनने सैनिकांची संख्या वाढवली आहे. यासोबतच ऊंच भागात उड्डाण घेण्यास अनुकूल असलेली जे-११ आणि जे-१६ एस ही लढाऊ विमानंही तैनात केली आहेत. चीनचे जे-११ हे लढाऊ विमान रशियाच्या सुखोई एसयू २७चे चिनी व्हर्जन आहे. दोन इंजिन असल्याने विमानाला अधिक पॉवर मिळते. हे विमान ३३००० किलोग्रॅम वजनासह उड्डाण करू शकते. हे विमान एका उड्डाणात १५०० किलोमीटर दूरपर्यंत मारा करू शकते.

 

News English Summary: Chinese President Xi Jinping should prepare for war, increase military training. The army has been ordered to be ready to deal with any situation quickly and effectively. The army has also been instructed to protect the country’s sovereignty, security and development interests.

News English Title: Chinese President Xi Jinping should prepare for war increase military training News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x