17 November 2019 9:48 PM
अँप डाउनलोड

कच्च्या तेलाच्या किंमतीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता

Saudi Arebia, Drone Attack, India saudi

नवी दिल्ली : सौदी अरेबियाच्या सरकारी तेल कंपनीच्या रिफायनरीवर दोन ड्रोन हल्ले करण्यात आले. यामुळे रिफायनरींना मोठी आग लागल्याने जगाचा तेलपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १० डॉलरनी वाढण्याची शक्यता आहे.

अरामको सरकारी कंपनीच्या दोन मोठ्या तेल रिफायनरींना शनिवारी रात्री लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यांमुळे तेल जगताला मोठा हादरा बसला आहे. तिकडे अमेरिकेने इराणला या हल्ल्यासाठी दोषी धरले आहे. यामुळे तेलाच्या किंमती प्रती बॅरल १० डॉलर म्हणजेच ७१० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबिया हा जगभरात तेल निर्यात करणारा मोठा देश आहे. दररोज साधारण ९८ दशलक्ष बॅरल कच्चे तेल सौदी अरेबियेतून निर्यात होते. या निर्णयामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याने तेलटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीतही एका रात्रीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

परिणामी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव १०० डॉलर/बॅरल जाण्याची शक्यता आहे. सध्याचा कच्च्या तेलाचा भाव ६० डॉलर प्रती बॅरल आहे. भारतात कच्च्या तेलाच्या एकूण आयातीपैकी १९ टक्के हिस्सा सौदी अरेबियातून येतो. त्यामुळे या दरवाढीचा फटका भारताला बसू शकतो. ही दरवाढ झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा वाढतील.

हॅशटॅग्स

#Petrol Price(6)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या