18 January 2025 4:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा
x

Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये

Government Job

Government Job | बरीच तरुण मंडळी इलेक्शननंतर विविध सरकारी नोकरी भरत्यांकडे डोळे लावून बसले होते. दरम्यान महाराष्ट्र शासनाने विविध क्षेत्रात सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सध्या समाज कल्याण विभागात भरती जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागात एकूण 219 जागांची रिक्त भरती काढली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून स्वतःची नोकरी मिळवावी. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. दरम्यान अर्जाची शेवटची तारीख चालू महिना 2024 च्या 15 डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखेत मुदतवाढ केल्यामुळे बरेच तरुण उमेदवार भरतीसाठी आनंदी आहेत.

कोणकोणत्या पदांसाठी भरती जाहीर :

समाज कल्याण आयुक्त पुणे या ठिकाणी समाज कल्याण निरीक्षक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी स्टेनोग्राफर, वॉर्डन आणि स्टेनोग्राफर टायपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

उमेदवाराची पात्रता काय असावी :

वरील पदांसाठी उमेदवाराची पात्रता कुठलीही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी. त्याचबरोबर कम्प्युटर विषयातील कोर्स देखील पूर्ण केलेले असावे. यासह एमएससीआयटी कोर्स देखील पूर्ण केलेला असावा. त्याचबरोबर आहे लघुलेखक पदासाठी उमेदवाराकडे स्टेनोग्राफरचा कोर्स पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे.

इथे करा अर्ज :

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 या वयोगटात दिलेले आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवाराला एकूण 25,500 ते 1,42,400 रुपये पगार देण्यात येणार आहे. उमेदवाराला अर्ज करावयाचा असल्यास sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

Latest Marathi News | Government Job 03 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Government Job(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x