14 December 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

MPSC Main Exam 2019 Result | राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर

MPSC Main Exam 2019

मुंबई, २८ सप्टेंबर | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल (MPSC Main Exam 2019 Result) जाहीर केला आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एमपीएससी 413 पदांचा निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा होती. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांनी राज्य सरकारचे आभार मानले होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Maharashtra Public Service Commission has announced the final revised result of State Service Examination 2019 (MPSC Main Exam 2019 Result). MPSC has issued a circular in this regard :

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 निकाल येथे पाहू शकता : Click Here

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळाव्यात म्हणून आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही नियुक्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला होता. 10 सप्टेंबर पुर्वी नियुक्त्या द्या, अन्यथा एमपीएससी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा विद्यार्थ्यांच्यां वतीनं देण्यात आल्यानंतर आयोगानं निकालाविषयी भूमिका जाहीर केली होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात यासाठी पत्र दिलं होतं. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, या 413 पदांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या आता निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MPSC Main Exam 2019 Result is declared.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x