17 November 2019 9:55 PM
अँप डाउनलोड

'अब की बार' सामान्यांच्या खिशावर जास्तच भार; पेट्रोलची नव्वदीकडे

मुंबई : इंधन दरवाढ कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही आणि त्यामुळे सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाईच्या भडका उडण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आज सुद्धा कायम आहे. मुंबईत पेट्रोल ११ पैशांनी वाढले आहे. परंतु, डिझेलच्या दरात २४ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी ८८.२९ रुपये प्रतिलिटर मोजावे लागणार आहेत. तर डिझेलसाठी प्रतिलिटर ७९.३५ रुपये मोजावे लागत आहेत.

दुसरीकडे राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचे प्रतिलिटर दर ८२.२३ रुपये तर डिझेल दर ७५.६९ एवढे आहेत. डिझेलमध्ये २३ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका सुरूच असल्याने महागाईमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झाले आहे असच म्हणावं लागेल. बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, अशी घोषणा देऊन नरेंद्र मोदी सत्तेत आले. मात्र सर्वसामान्यांची महागाईपासून सुटका झालेली नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1038)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या