13 May 2021 7:40 AM
अँप डाउनलोड

त्या धक्कादायक चॅट मध्ये | न्यायाधीशांसोबत सेटिंग | न्यायाधीशांना विकत घ्या...असा संवाद

Republic TV, Editor in chief Arnab Goswami, whatsapp chat, BARC CEO, TRP scam

मुंबई, १६ जानेवारी: ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलचे स्क्रीनशॉट शेअर करत असे लिहिले आहे की, हे बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यात झालेल्या चॅटचे व्हायरल झालेले फोटो आहेत. या फोटोंवरून अर्णब गोस्वामी यांचं संपूर्ण काटकारस्थान उघड होते. प्रशांत भूषण यांनी यासंदर्भात पुढे असे लिहिले आहे की, कशाप्रकारे मीडिया आणि आपल्या पदाचा गैरवापर केला गेला आहे. कायद्याला धरून चालणाऱ्या कोणत्याही देशात अनेक वर्षे तुरुंगात खडी फोडण्यासाठी इतके पुरावे खूप आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी आणि बार्कचे सीईओ यांच्यातील WhatsApp चॅट लीक झालेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. ट्विटर युजर्स अर्णब गोस्वामी हॅशटॅगसह कथित चॅट शेअर करत प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, याच चॅट मधील काही धक्कादायक संवाद हे चर्चेचा विषय ठरले आहेत. टीआरपी घोटाळा केस संदर्भात बोलताना, “तो न्यायाधीशांसोबत काही तरी सेटिंग करत असेल तर चांगलं आहे …. नाही तो करू शकत नाही ….. सदीप सेठी आक्रमक आहेत आणि म्हणूनच मी त्याला नेमले आहे …. न्यायाधीश विकत घ्या…असा धक्कादायक संवाद देखील झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

 

News English Summary: The leaked WhatsApp chat photos between Arnab Goswami and Bark’s CEO are going viral on social media. Twitter users are reacting by sharing alleged chats with the hashtag Arnab Goswami. Commenting on the same tweet of Prashant Bhushan, journalist Meena Das Narayan wrote that, and we will believe you? Give a reason so that we can believe what you say. In this tweet of Prashant Bhushan, user Parvez Khan has raised the question as to why no media house is covering this breaking news.

News English Title: Republic TV Editor in chief Arnab Goswami whatsapp chat with BARC CEO over TRP scam news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(158)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x