14 December 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्यात CAA, NRC आणि NPR वर चर्चा

Chief Minister Mamata Banerjee. PM Narendra Modi, NRC, CAA, NPR

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नागरिकत्व सुधारणआ कायदा (सीएए) आणि एनआरसी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यात सीएए आणि एनआरसीला आमचा विरोध असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे स्पष्ट केले. दिल्ली आणि कोलकाता दोन्ही शहरांमध्ये या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना, ही भेट झाली आहे.

केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने सीएए, एनपीआर व एनआरसी लागू करण्याचा घेतलेल्या निर्णयास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींच्या कोलकातात दौऱ्यानिमित्त या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे.

राजभवनात या दोन्ही नेत्यांमध्ये साधारण २० मीनिट चर्चा झाली. या भेटीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी औपचारिक भेट असल्याचेही म्हटले आहे. तर, चर्चेदरम्यान पंतप्रधानांना आपण सीएए, एनआरसी व एनपीआरच्या विरोध दर्शवला असल्याचेही त्यांनी सांगितले.

सीएए, एनआरसी व एनपीआर याचा आम्ही विरोध करत असून, काही झाले तरी पश्चिम बंगालमध्ये हे लागू केले जाणार नाही, हे निर्णय मागे घ्यावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्पष्टपणे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर दिली. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या राज्याच्या हिस्स्याचे २८ हजार कोटी रुपये केंद्राने शक्य तितक्या लवकर द्यावेत, अशी मागणीही केली असल्याचे त्या म्हणाल्या.

 

Web Title:  I told him that we are against CAA NPR and NRC Chief Minister Mamata Banerjee.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x