26 July 2021 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

CAA विरोध: आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही: यशवंत सिन्हा

Sharad Pawar, Yashwant Sinha, Gandhi Yatra, Opposed CAA NRC

मुंबई: सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

केंद्र सरकारने सत्तेचा दुरुपयोग केला असून सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या एकतेला तडे गेले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे समाजातील मोठ्या वर्गात नाराजी पसरली असून आता समाजातील सर्व वर्गांमध्ये एकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतातील नागरिकांना योग्य मार्ग दाखवण्याची आवश्यकता असून तो मार्ग महात्मा गांधी यांच्या विचारातून मिळेल.

भारतीय राज्यघटना धोक्यात आली असून ती वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याची आवश्यकता असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांतात यात्रेची सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. या शांतता यात्रेसाठी शरद पवार यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

 

Web Title:  Gandhi Yatra Begins at Gateway of India in Mumbai NCP President Sharad Pawar Showed a Green Flag.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(398)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x