14 December 2024 7:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

देशातील लॉकडाऊनमध्ये ३ मे पर्यंत वाढ, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Covid19, Corona Crisis, PM Narendra Modi

नवी दिल्ली, १४ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. करोना हॉटस्पॉट वाढले नाही तर नियम शिथील करण्यात येतील, असा दिलासाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलाय. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचं मूल्यांकन केलं जाणार आहे. जे प्रदेश करोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होतील तिथले नियम शिथील केले जातील, असंही त्यांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, कोरोनाची लढाई भारत नेटाने लढत आहे. तुमच्या धिरामुळे आणि त्यागामुळे आतापर्यंत कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात. इतर देशांशी तुलना करण्याची ही वेळ नाही. मात्र आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात असल्याचे मोदींनी सांगितले.

“महिन्यापूर्वी जे देश भारताच्या बरोबरीत होते, त्या देशांमध्ये भारतापेक्षा २५-३० टक्के जास्त बाधित झालेत, हजारो लोकं प्राणास मुकलीत. भारतानं योग्य वेळी चांगले निर्णय घेतले नसते तर भारताची स्थिती काय असती याचा विचार करवत नाही. परंतु या अनुभवातून हे स्पष्ट झालंय की आपण जो रस्ता निवडला तोच बरोबर आहे. सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाउनचा खूप फायदा झालाय. फक्त आर्थिक बाजू बघितलं तर खूप महाग पडल्याचं दिसू शकतं, खूप किंमत चुकवायला लागली, परंतु जिवितापेक्षा मोठं काही नाही,” असं नरेंद्र मोदींन यावेळी म्हटलं.

 

News English Summary: Today is the last day of the 21-day nationwide lockdown announced by Prime Minister Narendra Modi. Addressing the people on this day, Prime Minister Narendra Modi has announced that the nationwide lockdown will continue till May 3. Prime Minister Narendra Modi has assured the country that the rules will be relaxed if the Karuna hotspot is not increased. Each region will be evaluated by April 20. He said the rules will be relaxed in the areas that are successful in controlling the coronation.

News English Title: Story Prime Minister Narendra Modi says lockdown will be extended across India till may 3 Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x