3 December 2021 12:59 PM
अँप डाउनलोड

आगामी वसई-विरार महापालिका निवडणूक | पंकज देशमुख शिवसेनेच्या वाटेवर

Pankaj Deshmukh, Bahujan Vikas Aghadi, Shivsena, Vasai Virar Corporation Municipal Elections

वसई विरार, १६ जानेवारी: वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर सध्या स्थानिक पातळीवरील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. वसई विरार पट्ट्यातील महत्वाचा पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला निवडणुकीआधीच राजकिय धक्का बसला आहे. शिवसेनेने निवडणुकीपूर्वी जोर लावण्यास सुरुवात केली असून बहुजन विकास आघाडील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. (Pankaj Deshmukh has left Bahujan Vikas Aghadi party to join Shivsena before Vasai Virar Corporation Municipal Elections)

त्याचाच महत्वाचा भाग म्हणजे बहुजन विकास आघाडीचे स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकूर कुटुंबासाठी हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.

पंकज देशमुख यांनी समाज माध्यमांवर पोस्ट टाकत बहुजन विकास आघाडीला जाहीर रामराम केला आहे. पंकज देशमुख शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी वसई विरार महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बविआला धक्का बसून शिवसेनेला मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे.

पंकज देशमुख हे बहुजन विकास आघाडीचे माजी उपमहापौर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उमेश नाईक यांचे नातेवाईक आहेत. तर माजी सभापती निलेश देशमुख यांचे चुलतभाऊ आहेत. पंकज देशमुख यांचे नालासोपारा शहरात युवा कार्यकर्त्यांचे मोठे संघटन आहे. येत्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी बविआला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: With the Vasai Virar Municipal Corporation elections looming, politics at the local level is beginning to heat up. The Bahujan Vikas Aghadi, an important party in the Vasai Virar belt, has already suffered a political setback ahead of the elections. An important part of this is that Pankaj Deshmukh, a staunch supporter of Bahujan Vikas Aghadi local MLA Kshitij Thakur, has left the party. Therefore, this is being considered as a big political blow for the Thakur family before the Vasai Virar Municipal Corporation elections.

News English Title: Pankaj Deshmukh has left Bahujan Vikas Aghadi party to join Shivsena before Vasai Virar Corporation Municipal Elections news updates.

हॅशटॅग्स

#Hitendra Thakur(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x