18 November 2019 12:14 AM
अँप डाउनलोड

अब की बार 'महागाई कंबरडं मोडणार', पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग

मुंबई : पेट्रोल डिझेलचे भाव रोज वाढतच असून त्याचा परिणाम थेट महागाई वाढण्यात होत असल्याने, सामान्य लोकं सणासुदीच्या दिवशी पुरते हैराण झाले आहेत. शनिवारी पेट्रोलचा मुंबईतला दर ८७ रूपये ७७ पैसे असा आहे. तर डिझेलचा दर ७६ रूपये ९८ पैसे इतका झाला आहे. दुसरीकडे, राजधानी दिल्लीतला शनिवारचा दर ८० रूपये ३८ पैसे लिटर इतका आहे, तर डिझेलचा दर ७२ रूपये ५१ पैसे इतका झाला आहे. कालच्या तुलनेत आजचा पेट्रोलचा दर ३८ पैशांनी अधिक झाला आहे.

सातत्याने घसरणारा रुपया तसेच आंतराष्ट्रीयबाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर सर्वप्रथम दिसून येतो. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्णपणे मोडीत काढली होती. त्यानुसार, दररोज सकाळी सहा वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत अंमलात आणली आहे. त्यानुसारच नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘बस हुई महेंगाई की मार, अब की मोदी सरकार’ असा नारा देत सत्तेत आलेलं मोदी सरकार सध्या महागाई आणि वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर शांत बसले असून केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र देश भर आहे. त्याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या