12 December 2024 2:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

बेरोजगार युवक मोदींच्या २ कोटी रोजगाराची आतुरतेने वाट बघत आहेत : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या ‘शेड्स ऑफ ट्रूथ- ए जर्नी डिरेल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते काल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अनेक आश्वासनांचे वाभाडे काढले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारच्या अनेक फसव्या घोषणांना उजाळा दिला.

त्यावेळी बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन कोटी रोजगार देऊ, युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु ते हवेत विरले का? बेरोजगार युवक २ कोटी रोजगाराची खूप आतुरतेने वाट पहात आहेत, असा टोला लगावला. मागील ४ वर्षात रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी त्या अधिक प्रमाणात घटल्या आहेत. आम्ही रोजगाराच्या, नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या असे नरेंद्र मोदी सरकारकडून सांगण्यात येत असले तरी सुद्धा त्यात अजिबात तथ्य नसल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोलताना डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, स्टँड अप इंडिया यांसारख्या योजनांचा हवा तसा सकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. केवळ घाईने घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या आणि जीएसटी लागू करण्याच्या निर्णयामुळे आर्थिक आघाडीवर देशातील उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे अशी जाहीर टिपणी सुद्धा त्यांनी केली आणि मोदी सरकारच्या विविध योजनांचे वाभाडे काढले.

विद्यमान कृषी व्यवस्थेवर बोलताना मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात देशातल्या शेतकऱ्यावर दुर्दैवाने अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. कारण या मोदी सरकारचे कृषी विषयक धोरण शेतकऱ्यांना पुरक असे ठरू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकांच्या आधी मोदींनी जी आश्वासने दिली होती त्यातील कोणतेही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेली नाहीत, अशीही जळजळीत टीका त्यांनी उपस्थितांसमोर बोलताना केली.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x