25 March 2025 8:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई, शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS
x

महागाईमुळे मखर ते कांदे, सामान्यांसाठी सगळ्याचेच वांदे!

मुंबई : मागील दोन आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दार सातत्याने वाढत आहेत. परिणामी वाहतूक खर्च वाढत असल्याने त्याचा थेट फटका भाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंना सतत बसत आहे. भाज्यांचे दरा तर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने गणेश भक्तांना गणेशमूर्तींपासून पूजासाहित्यापर्यंत सर्वच खरेदीसाठी खिसा जाळावा लागत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या घरोघरी पैशाची चणचण जाणवत आहे.

अगदी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी लागणाऱ्या दैनंदिन पूजासाहित्य सामुग्रीचा विचार केल्यास कापूर, कापसाच्या वाती, अगरबत्तींचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले पाहायला मिळत आहे. तर कापराचे दर प्रति पाव किलोमागे तब्बल १०० रु.इतके प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे पाव किलो कापरासाठी आता २५० ते ३०० रुपयांपासून ते थेट ४०० रु.पर्यंत दर सांगितला जात आहे. कापूर ज्वलनशील वस्तू असल्याने त्यावर एकूण १८ टक्के इतका जीएसटी लागतो. परणामी त्याची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरीकडे पूजेसाठी महत्वाच्या अशा अगरबत्तीचे दर सुद्धा ४०० रुपये किलो ते १००० रुपये किलोच्या दरम्यान दिसून येत आहेत. अगरबत्तीवर सुद्धा ५ टक्के जीएसटी लागू होतो. मागील वर्षी ३०० रुपयांना मिळणारा अगरबत्तीचा पुडा यंदा ५०० ते ५२५ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर एखादा पूजेचा संपूर्ण संच जरी घ्यायला गेलं तर ते सुद्धा २५० ते ३०० रु. वरून ५० ते १०० रु.नी महागल्याने सामान्य लोकं बाजार करताना पुरते हैराण झालेले पाहायला मिळत आहेत.

विशेष म्हणजे गणेशवस्त्रांच्या किमतीही यंदा ,अथय प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांनी मूर्तीचा आकार, मूर्तीवरील कलाकुसर, मखर यामध्ये थोडीशी कपात करून खर्चावर नियंत्रण करण्याचे प्रकार अवलंबले आहेत. सर्वाधिक दैनंदिन पूजेचे साहित्य ही त्यांची प्राथमिक गरज असल्याचे पाहावयास मिळत आहे. परंतु बाप्पाच्या पूजेच्या साहित्यात कपात कशी करणार अशी खंत सुद्धा अनेक भक्तांनी बोलून दाखवली.

दुसरीकडे महागाईमुळे रोजच्या जेवणात लागणाऱ्या भाज्यांचे भाव सुद्धा प्रचंड वाढले आहेत. त्यात घाऊक बाजारात येणाऱ्या मालामध्ये चांगली गुणवत्ता असलेल्या भाज्यांचे प्रमाण कमी झाल्याने, ज्या चांगल्या भाज्या किरकोळ विक्रीसाठी नेल्या जातात, त्यांचे मूळ प्रमाण घटल्याने किरकोळ विक्रेते त्या वाढीव दराने विकत आहेत असं निदर्शनास येत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे मखर ते कांदे, सामान्यांसाठी सगळ्याचेच वांदे! असच म्हणावं लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या