14 December 2024 6:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Gujarat Politics | तब्बल 22 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता | दिग्गज नेते नितीन पटेल यांनाही मोदी-शहांचा राजकीय शह

Deputy CM Nitin Patel

गांधीनगर, १६ सप्टेंबर | विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी झाला. यादरम्यान पाच आमदारांनी एकत्र मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे, ज्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Gujarat Politics, तब्बल 22 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता, दिग्गज नेते नितीन पटेल यांनाही मोदी-शहांचा राजकीय शह – Deputy CM Nitin Patel also excluded from new Gujarat cabinet ministers team :

सर्व नव्या चेहऱ्यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी त्यांची संपूर्ण नवीन टीम तयार केली. 24 आमदारांना राजभवनात दुपारी 1:30 वाजता पदाची शपथ देण्यात आली. 10 कॅबिनेट आणि 14 राज्यमंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची 22 मंत्र्यांचा संपूर्ण टीम वगळण्यात आली, ज्यात माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश आहे. नवीन मंत्रिमंडळाची पहिली बैठक सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. या बैठकीत पदांचे वितरण केले जाईल असे सांगितले जात आहे.

या मंत्र्यांनी शपथ घेतली:
कॅबिनेट मंत्री: राजेंद्र त्रिवेदी, जितू वाघानी, राघव पटेल, पूर्णेश मोदी, नरेश भाई पटेल, प्रदीप सिंह परमार, अर्जुन सिंह चव्हाण, ऋषिकेश पटेल, कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा.

राज्यमंत्री: निमिषा सुतार, मुकेश पटेल, अरविंद रयानी, कुबेर दिंडोर, कीर्ती सिंह वाघेला, गजेंद्रसिंह परमार, देवाभाई मालम, राघवजी मकवाना, विनोद भाई मोराडिया.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Deputy CM Nitin Patel also excluded from new Gujarat cabinet ministers team.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x