महत्वाच्या बातम्या
-
Gujarat BJP CR Patil | भाजपचे सरकार असल्याने भाजप कार्यकर्ते व त्यांच्या मुलांना आरामात नोकरी मिळेल - सीआर पाटील
मागील काही दिवसांपासून अनेकविध पक्षातील नेत्यांच्या अनेक खळबळजनक आणि वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघत आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांना पूर आल्याचे चित्र आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मोठे विधान केले असून, भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या मुलांनी नोकरीची अजिबात चिंता (Gujarat BJP CR Patil) करू नये, ती त्यांना आरामात मिळेल. भाजपचेच सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांना मागे ठेवणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gujarat Fake Development | गुजरातच्या भाजप खासदाराने गुजरातचा विकास दाखवताना न्यूझीलंडचे फोटो शेअर केले
गुजरातचे पोरबंदर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे खासदार रमेशभाई धाडुक यांनी काल (30 सप्टेंबर) रोजी एक इन्फोग्राफिक ट्विट केली. इन्फोग्राफिकमध्ये चकाचक रस्ते आणि फ्लायओव्हर तसेच दिव्यांची रोषणाई असल्याचं दिसत होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘राष्ट्रीय महामार्ग -२, उमवाडा चौकडी, रामनाथ धाम गोंडल जवळच्या रस्त्यावर अंधार असल्याने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उंच दिव्यांचा टॉवर उभारण्याचा प्रस्ताव दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या फेक विकासाची पावसामुळे पोलखोल | राज्यात राज्य महामार्गांसह 103 रस्ते बंद ठेवण्याची नामुष्की
सौराष्ट्र, कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागासह गुजरातच्या अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस पडला. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे की देशातील काही पश्चिम राज्यात पुढील ४ दिवस पाऊस अजून पडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबईत २ ग्राम ड्रग्स पकडली तरी माध्यमं हंगामा करतात | गुजरातमध्ये ३ हजार KG ड्रग्स पकडल्यावर मीडिया शांत? - हार्दिक पटेल
गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो हेरॉईन पकडण्यात आली, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त
गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरॉईन पकडण्यात आले आहे, ज्याची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातच्या 4 जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूर | तर यूपीत मुसळधार पावसामुळे 15 मृत्युमुखी
देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह १० हून जास्त राज्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती आहे. गुजरातमध्ये घरे-दुकाने, रेल्वे मार्ग पाण्यात बुडाले आहेत. गुजरातच्या चार शहरांत राजकोट, केसोद, पाेरबंदर आणि वलसाडमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gujarat Politics | तब्बल 22 मंत्र्यांना बाहेरचा रस्ता | दिग्गज नेते नितीन पटेल यांनाही मोदी-शहांचा राजकीय शह
विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी झाला. यादरम्यान पाच आमदारांनी एकत्र मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे, ज्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Gujarat New Cabinet Ministers | गुजरातमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळच बदलले | २४ नवे चेहरे, ८० टक्के तरुण मंत्री
विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी झाला. यादरम्यान पाच आमदारांनी एकत्र मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे, ज्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये मंत्रिमंडळ बदलण्याची मोदी-शहांची योजना | भाजपमध्ये मोठ्या राजकीय बंडाची शक्यता
गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतल्यानंत लवकरच मंत्रिमंडळाची स्थापना होईल अशी शक्यता होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांवरुन सरकारची गाडी अडली आहे. आणि नाराज आमदार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी जमा झाले आहेत. मुख्यमंत्र्यांआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार होता, मात्र या पेचामुळे हा शपथविधी लांबणीवर टाकण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदींच्या गुजरात विकासाची पोलखोल | पावसामुळे शहरांना गटाराचे स्वरूप | तर रस्त्यांवर धबधबे
मुसळधार पावसामुळे गुजरातच्या अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा जास्तीत जास्त परिणाम राजकोट आणि जामनगरमध्ये जाणवला आहे. ढगफुटीमुळे राजकोटमध्ये गेल्या 24 तासांत 7 इंच आणि जामनगरमध्ये 10 इंच पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक भागात 10 फुटांपर्यंत पाणी तुंबले आहे.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातचा विकास होतोय, तर मुख्यमंत्री रातोरात का बदलला? | मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही हाच मोदींचा संदेश - शिवसेना
गुजरातचा विकास, प्रगतीचे मॉडेल आणि गुजरातच्या मुख्यमंत्री बदलावर शिवसेनेने खोचक टीका केली आहे. ‘पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?’ असा बोचरा सवाल शिवसेनेने दैनिक सामनाच्या माध्यमातून केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांची कर्नाटक नीती | पटेल समाजाचा मुख्यमंत्री बसवून नितीन पटेल यांचे पंख छाटले? - सविस्तर वृत्त
२७ दिवसांपूर्वीच भाजपानं आगामी २०२२ विधानसभा निवडणूक विजय रुपाणी-नितीन पटेल यांच्या जोडीसोबत लढणार असल्याचं जाहीर केले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जेव्हापासून अहमदाबाद सोडून दिल्लीचं तख्त सांभाळलं आहे. तेव्हापासून गुजरातमध्ये भाजपाच्या नेतृत्वावर संकट येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड
भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाली आहे. पटेल यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले. ही बैठक दुपारी 3 वाजता प्रदेश भाजपचे मुख्यालय कमलम येथे झाली होती. नवा नेता राज्यापालांना भेटणार आणि सरकार स्थापनेचा दावा करणार.
3 वर्षांपूर्वी -
भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येताच उपमुख्यमंत्री नितीन पटेलांची बंडाची भाषा? | भाजपमध्ये धाकधूक
गुजरातमध्ये भाजपची नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. राजधानी गांधीनगरला भाजपाचे आमदार जमा झालेत. भाजपचे पर्यवेक्षक तोमर, प्रल्हाद जोशी हेही ह्या बैठकीत आहेत. ज्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे ते मनसुख मांडवीय, नितीन पटेलही यांनीही बैठकीला हजेरी लावलीय. गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण याची देशभरात उत्सुकता आहे. अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये भाजपची स्थिती बरी नाही | ५ वर्षापूर्वी भाजपला काठावरचं बहुमत मिळालं - संजय राऊत
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता. सुत्राच्या माहितीनुसार 2021 मध्ये भाजपच्या प्रदेश नेत्यांनी रुपाणी यांच्याविरोधात पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल दिला होता.
3 वर्षांपूर्वी -
RSS व भाजपाच्या ऑगस्टमधील गुप्त सर्वेक्षणातील धक्कादायक आकडेवारीमुळे रुपाणींचा राजीनामा? - सविस्तर वृत्त
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा भाजपने घेतलेला राजीनामा ही रणनीती आहे की अचानक घेतलेला निर्णय आहे? विजय रुपाणी यांचा राजीनामा अचानकपणे घेण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. विजय रुपाणी आणि पक्षाच्या संघटनात खूप दिवसांपासून मतभेद सुरू होते. भाजपचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध नव्हते. त्याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी अनेकदा हस्तक्षेप केला होता.
3 वर्षांपूर्वी -
भाजपकडून दिशाभूल | कोरोनामधील अराजकता व अपयशामुळे लोकांमध्ये नाराजी वाढल्याने रुपाणींचा राजीनामा - हार्दिक पटेल
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये डिसेंबर 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे गुजरातच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातच्या विकासाची ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा उत्साह, नवी ऊर्जेसह पुढे जावी. हे लक्षात घेत गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचं रुपाणी यावेळी म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
कार्यकाळ पूर्ण होण्याच्या वर्षभरापूर्वीच रुपाणींनी मुख्यमंत्रीपद सोडले | आता मनसुख मंडाविया आघाडीवर
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पक्षातील जबाबदाऱ्या काळानुसार बदलत राहतात. पक्षात ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमध्ये खेळाडूंची अनास्था | देशाला अंध वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू करतोय मजुरी
सध्या टोक्यो ऑलिम्पिक २०२० पार पडली. यामध्ये भारतानेएकूण 7 पदकं जिंकली आहेत. त्यानंतर पदक विजेत्या भारतीय खेळाडूंवर विविध माध्यमातून पैशाचा पाऊस पडत आहे. मोदींनी तर या खेळाडूंच्या यशप्राप्तीवरून स्वतःचा मोठा PR केल्याचं देखील लपून राहिलेलं नाही. विशेष म्हणजे मोदी सरकारने ऑलिम्पिक वर्ष असताना देखील यावर्षीच्या स्पोर्ट्स बजेटमध्ये तब्बल २३० कोटीची काटछाट केली होती. त्यामुळे मोदी सरकारची अनास्था तेव्हाच स्पष्ट झाली होती.
3 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये भीषण अपघात | झोपडपट्टीत ट्रक घुसला, 25 जणांना चिरडले | 8 जागीच ठार, 4 जण गंभीर
गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील बरडा गावाजवळ एक ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत घुसला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. 16 लोक जखमी झाले आहेत. यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांना सांवरकुंडला येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रक भावनगर जिल्ह्यातील महुवा शहराच्या दिशेने जात होता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News