26 May 2022 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Gujarat BJP CR Patil | भाजपचे सरकार असल्याने भाजप कार्यकर्ते व त्यांच्या मुलांना आरामात नोकरी मिळेल - सीआर पाटील

Gujarat BJP CR Patil

गांधीनगर, १३ ऑक्टोबर | मागील काही दिवसांपासून अनेकविध पक्षातील नेत्यांच्या अनेक खळबळजनक आणि वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघत आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांना पूर आल्याचे चित्र आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मोठे विधान केले असून, भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या मुलांनी नोकरीची अजिबात चिंता (Gujarat BJP CR Patil) करू नये, ती त्यांना आरामात मिळेल. भाजपचेच सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांना मागे ठेवणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

Gujarat BJP CR Patil. BJP state president in Gujarat CR Patil has made a big statement that BJP workers and their children should not worry about jobs, they will get it comfortably. As the BJP is the government, it will not leave the party workers behind, said CR Patil :

गुजरातमधील साबरकांठा येथील हिम्मतनगर येथे बोलताना सीआर पाटील यांनी सदर विधान केले आहे. भाजप कार्यकर्त्याला सहजपणे नोकरी मिळू शकेल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, तो भाजपचा कार्यकर्ता असायला हवा, हे निश्चित, असे पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

आमचे कार्यकर्ते विचारतात. गेल्या २० वर्षांपासून मी भाजपसाठी काम करतोय. एक गोष्ट विचारायची होती. पण ती सांगावी का याबाबत द्विधा मनःस्थिती आहे. कशी विचारावी याबाबत संकोच वाटतोय, यावर त्या व्यक्तीला मोकळेपणाने बोलायला सांगितल्यावर तो कार्यकर्ता म्हणाला की, माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रयत्न करून झाले. मात्र, या भेटीनंतर त्याच्या मुलाला नोकरी लागली. भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला पाठी ठेवणार नाही. कार्यकर्त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gujarat BJP CR Patil said BJP party workers will job easily because of BJP government.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x