12 December 2024 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मोदी-शहांची कर्नाटक नीती | पटेल समाजाचा मुख्यमंत्री बसवून नितीन पटेल यांचे पंख छाटले? - सविस्तर वृत्त

Patel Community in Gujarat

गांधीनगर, १३ सप्टेंबर | २७ दिवसांपूर्वीच भाजपानं आगामी २०२२ विधानसभा निवडणूक विजय रुपाणी-नितीन पटेल यांच्या जोडीसोबत लढणार असल्याचं जाहीर केले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जेव्हापासून अहमदाबाद सोडून दिल्लीचं तख्त सांभाळलं आहे. तेव्हापासून गुजरातमध्ये भाजपाच्या नेतृत्वावर संकट येत आहे.

मोदी-शहांची कर्नाटक नीती, पटेल समाजाचा मुख्यमंत्री बसवून नितीन पटेल यांचे पंख छाटले? – Narendra Modi gave big political set back to DCM Nitin Patel over Patel community politics in Gujarat :

नरेंद्र मोदी यांच्यानंतर आनंदी बेन पटेल यांनी कमान सांभाळली. परंतु त्यांच्याविरोधात लोकांचा आक्रोश वाढला त्यानंतर भाजपाने नेतृत्वात बदल करुन विजय रुपाणी यांच्यावर जबाबदारी दिली. अलीकडेच विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाची ५ वर्ष पूर्ण केली. १६ ऑगस्ट रोजी गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांनी आगामी निवडणूक विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं विधान केले होते. गुजरातमध्ये अनेक दिवसांपासून नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यावेळी पक्षाने रुपाणी-पटेल जोडी चांगले काम करत असून बदल करण्याची गरज नाही असं म्हटलं.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजयासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले. ज्यामुळे रुपाणी यांच्याविरोधात संतापाची लाट पसरली. गेल्या अनेक दिवसांपासून पटेल समुदायही भाजपावर नाराज होता. ही सगळी कारणं पाहता भाजपानं विधानसभा निवडणुकीच्या १ वर्ष आधी मुख्यमंत्री चेहरा बदलण्याचा निर्णय घेतला. पटेल समुदायातील भूपेंद्र पटेल यांना संधी देत समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तर इतर राज्यांप्रमाणे गुजरातमध्ये सुद्धा स्वतःपेक्षा कोणालाही राजकीय दृष्ट्या मोठं होऊ द्यायचं नाही असा मोदी-शहांचा प्रयत्न राहिला आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकात येडियुरप्पा यांच्या लिंगायत समाजाच्या राजकारणाला शह देत मोदी-शहांनी त्याच समाजाचा दुसरा नेता मुख्यमंत्री बनवून येडियुरप्पा यांचं राजकारण संपुष्टात आणलं आणि कर्नाटकात स्वतःची पकड बनविण्यात मोदी-शहा यशस्वी झाले. तेच तंत्र गुजरातमध्ये वापरून पटेल समाजाचे नेते असलेल्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना शह देत त्याच पटेल समाजाचे आमदार भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवून नितीन पटेल यांचं बंड आधीच गुंडाळलं आहे.

नरेश पटेल यांचे विधान अत्यंत महत्वाचे ठरले:
अलिकडेच खोडलधाम ट्रस्टचे चेअरमन नरेश पटेल यांच्या एका वक्तव्याने वाद उभारला होता. नरेश पटेल यांनी, मुख्यमंत्री हा पाटीदार असावा, असे विधान केले होते. आता त्यांच्या विधानाने मूर्त रूप घेतले आहे. भाजपमध्ये पाटीदारांचे वजन आहे. भूपेंद्र पटेल यांना पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे, पाटीदार समाजाला आनंद होईल आणि जे पाटीदार काँग्रेस आणि आम आदमी पक्षात गेले ते परत भाजपमध्ये येण्याची शक्यता बळावली आहे.

पुढील 14 महिने नव्या मुख्यमंत्र्यांसाठी आव्हानात्मक:
मुख्यमंत्री झाल्यावर भुपेंद्र पटेल यांच्या पुढील 14 महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त 14 महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, 2022 मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.

भूपेंद्र पटेल हे तळागळातून वर आलेले नेते:
पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांची पक्षाचे मृदुभाषी कार्यकर्ता अशी ओळख आहे. विशेष म्हणजे, ते तळागळातून वर आलेले नेते आहे. नागरपालिकेपासून त्यांनी राजकारणात प्रवेश करत आज मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांनी 2017 साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढवली होती. अहमदाबादच्या घाटलोदिया येथून त्यांनी निवडणूक लढवत 1 लाख 17 हजार विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळवला.

प्रेमाने ‘दादा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भूपेंद्र पटेल यांना गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तरप्रदेश राज्याच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाते. त्याचबरोबर, ते ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तो गांधीनगर लोकसभा मतदारसंघ ज्याचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री अमित शहा करतात त्याचा भाग आहे.

भूपेंद्र पटेल यांनी सन 2015 आणि 2017 दरम्यान अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे चेअरमन पद भूषविले आहे. त्यापूर्वी सन 2010 आणि 2015 दरम्यान ते गुजरातमधील सर्वात मोठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था अहमदाबाद महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. भूपेंद्र पटेल हे त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये हसतमुख आणि तळागळाशी चांगले जुळलेले नेते म्हणून ओळखले जातात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Narendra Modi gave big political set back to DCM Nitin Patel over Patel community politics in Gujarat.

हॅशटॅग्स

#NitinPatel(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x