27 April 2024 2:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

ऑर्डर निघाल्यावर कंपनीला १ पैसा अदा केलेला नाही | मग १५०० कोटी घोटाळ्याचा जावईशोध कुठून? - मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, २८ सप्टेंबर | भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कोहापूरला जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर तिसरा मोठा आरोप केलाय. मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने तब्बल १५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय. सोमय्या यांच्या या आरोपानंतर आता हसन मुश्रीफांनीही पत्रकार परिषद घेत सोमय्यांना जोरदार (Minister Hasan Mushrif reply to Kirit Somaiya) प्रत्युत्तर दिलं आहे.

Minister Hasan Mushrif reply to Kirit Somaiya over serious allegations about 1500 crore rupees scam :

किरीट सोमय्या यांनी साखर कारखान्याबाबत खोटी माहिती दिली. आता माझ्या जावयाचं आणि कुटुंबाचं नाव घेत आहेत. हा प्रकार निषेधार्ह आहे. मी आतापर्यंत त्यांच्या आरोपांबाबत खुलासा केला आहे. राजकीय आणि सामाजिक जिवनात आपण 25 वर्षे काम केलेलं असतं आणि कुणीतही उठावं आणि चिखलफेक करावी हे आम्ही कदापीही सहन करणार नाही असं मुश्रीफ म्हणाले.

ग्रामविकास विभागात अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागाकडे एक पत्र पाठवलं होतं. अनेक ग्रामपंचायतीत पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे कंत्राटदार हे जीएसटी घेतात पण जीएसटी भरत नाहीत. टीडीएस कापत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेला मोठा दंड भरावा लागतो. त्याबाबत राज्यभरात एक युनिफॉर्म व्यवस्था असावी. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत जे लेखा परिक्षक काम करतात. त्यांचे काय पैसे द्यायचे? याबाबत सुसुत्रता असावी. म्हणून ग्रामविकास विभागाच्या या प्रस्तावाला मी मंजुरी दिली. माझ्या माहिती प्रमाणे जानेवारीमध्ये आपण काही अटीशर्थींसह त्याची निविदा प्रसिद्ध केली. त्यात कशा प्रकारच्या कंपन्या असाव्या, कसं काम करावं. त्यावेळी आपण हे पहिल्यांदाच सांगितलं की हे ऐच्छिक असेल’.

ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीला एक पैसा अदा करण्यात आलेला नाही मग…
निविदेद्वारे येणारे दर जर जास्त असतील आणि तुम्हाला कमी दराने काम करायला कुणी तयार होत असेल तर कमी दराने करा. म्हणजे हे ऐच्छिक ठेवलं होतं. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लेखापरिक्षणात सुसुत्रता यावी म्हणून आपण दर निश्चित केले. मात्र आपण हे बंधनकारक केलं नाही. हा निधी आपल्या स्वनिधीमधून किंवा कुठल्याही निधीमधून ते देतील. म्हणजे राज्य सरकारनं एकत्रितपणे यातील कुठलीही भूमिका ठेवली नाही. जर भ्रष्टाचार करायचा असता तर राज्य सरकारनं आपल्याकडे पैसे घेतले असते आणि ते दिले असते. ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीला एक पैसा अदा करण्यात आलेला नाही, मग यांनी पंधराशे कोटी रुपये घोटळ्याचा जावईशोध कुठून लावला?’ असा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Minister Hasan Mushrif reply to Kirit Somaiya over allegation of rupees 1500 crore scam.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x