27 July 2024 6:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मोदींनी मुलांसाठी एक शाळाही उभारलेेली नाही: अरविंद केजरीवाल

दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी थेट शिक्षणव्यवस्था तसेच नव्या शाळांचा दाखल देत दिल्लीतील पालकांना ‘देशभक्ती’ आणि ‘मोदीभक्ती’ या दोन्हीपैकी एक पर्याय निवडण्याचे आवाहन केले आहे.

शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना ते संबोधित करत होते. सदर कार्यक्रमाचे दिल्लीतील सातशे शाळांमध्ये थेट प्रक्षेपण सुद्धा करण्यात आले. दरम्यान पुढे ते म्हणाले, ‘तुम्ही जर सामान्य जनतेला कोणाला मतदान करणार असा थेट प्रश्न विचारला, तर ते मोदीजींना म्हणून प्रतिउत्तर देतात. पण का मतदान करणार असे, विचारले तर ते म्हणतात, कारण आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. आता तुम्ही हे निश्चित ठरवा की, तुमचं प्रेम तुमच्या मुलांवर आहे की मोदींवर. कारण जर तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर त्याला मतदान करा, जो तुमच्या मुलांसाठी काम करतो. जर तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम नसेल तर मोदींना मतदान करा..कारण नरेंद्र मोदींनी मुलांसाठी एक शाळाही उभारलेेली नाही. तुम्ही एकतर ‘देशभक्ती’ करू शकता किंवा ‘मोदीभक्ती’. परंतु दोन्ही एकाचवेळी करू शकत नाही.

दरम्यान सदर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सुद्धा पालकांना ‘आप’ला मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, ‘कोणीतरी मला म्हटलं की, निवडणुकीत ते मोदींना मतदान करणार आहेत… कारण ते चांगले वाटतात..! मी त्यांना म्हटलं की तुमचं जर तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर मतदान त्यांना करा ज्यांनी तुमच्या मुलांसाठी अत्याधुनिक शाळा उभ्या केल्या. त्यामुळं मी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही घरी जा आणि तुमच्या पालकांना विचारा की तुम्ही आमच्यावर प्रेम करता की नाही? जर त्यांनी तुमच्यावर प्रेम करतो असं म्हटलं, तर त्यांना तुमच्यासाठी शाळा बांधणाऱ्यांना मत देण्याची विनंती करा.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x