27 September 2023 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

पुणे महानगरपालिका निवडणूक | युतीच्या गप्पा सोडून स्वबळाच्या तयारीला लागा | राज ठाकरे यांचा संदेश

Raj Thackeray

पुणे, २९ सप्टेंबर | महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच त्यासाठी भाजपाही इच्छुक असेल असे मनसे अध्यक्षांना वाटत नाही. .दुसरीकडे या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा संदेश मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. परंतु , आता हि चर्चा थांबवावी असा संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना धाडल्याचे वृत्त आहे. तसेच पुण्यातही स्वबळाची तयारी करा असं देखील आवर्जून सांगितलं आहे.

Pune pocal MNS leaders have given the message that Maharashtra Navnirman Sena should form an alliance with BJP for the elections. However, it is reported that Raj Thackeray has sent a message to the MNS leaders in Pune to stop this discussion :

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब राज ठाकरे यांच्या कानावरही घातली होती. परंतु, राज ठाकरे सध्या अत्यंत सावधपणाने पावले टाकताना दिसत आहेत.

मागील निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Raj Thackeray ordered to Pune MNS leaders to stop talking on alliance with BJP in Pune municipal corporation election 2022.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x