27 April 2024 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

श्री सदस्यांच्या मनातील आप्पासाहेब धर्माधिकारींचं स्थान पाहून सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी उपयोग?

11 Shri Sadasya Dead

11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai | डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नवी मुंबईच्या खारघर कॉर्पारेट पार्क मैदानात झाला. मात्र या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. मुख्यमंत्री यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली असली तरी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून या घडलेल्या प्रकाराबद्दल कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दरम्यान, या घडलेल्या दुर्दैवी घटनेप्रकरणी धर्माधिकारी कुटुंबाकडून दुखवटा पाळण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटले :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताचा तडाखा बसलेल्या रुग्णांची आज विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करतानाच मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केलं. हा सोहळा राजकीय हेतूने घेतला होता का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर राजकीय स्वार्थाशिवाय एवढ्या लोकांना बोलावलं जातं का? असा प्रतिसवाल करत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारला सुनावले.

राष्ट्रवादीने सुद्धा शिंदे-फडणवीस सरकारला झापले
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी एवढा खर्च करण्यात आला. पाण्यासारखा पैसा ओतला. मग लोकांसाठी चांगली व्यवस्था का करता आली नाही? केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी चांगली व्हीआयपी व्यवस्था होती. मात्र भक्त संप्रदायाचे सदस्य लाखोंच्या संख्येने येतील हे प्रशासनाला कळलं नाही का? मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख दिले जात आहेत असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

या सोहळ्यावर प्रचंड खर्च झाल्याचं देखील समोर आलं आहे. मात्र हा पैसा VIP, शिंदे समर्थक आणि वरिष्ठ भाजप पदाधिकाऱ्यांसाठी सेवांवर खर्च करण्यात आला. कारण श्री सदस्य केवळ तहानलेले, भुकेले उष्णतेने तळपणाऱ्या जमीनीवर बसून होते. त्यामुळे VIP, शिंदे समर्थक आणि वरिष्ठ भाजप पदाधिकारी टवटवीत राहिले, मात्र श्री सदस्य उष्ण उन्हात बराचवेळ होरपळत होते. श्री सदस्यांच्या प्रचंड गर्दीचा वापर सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर केल्याचं पाहायला मिळालं. श्री सदस्य राज्यातील सर्वच भागातून आलेले असल्याने याचा राजकीय शक्तिप्रदर्शन म्हणून उपयोग करायचा होता असं देखील सत्तेतील काही नेते मंडळींनी ऑफ कॅमेरा सांगितलं. सत्ताधाऱ्यांच्या मागील अनेक सभा आणि राजकीय रॅलीत सामान्य लोकं निघुन जाताना दिसत असून एकावर एक सभा फ्लॉप झाल्याने माध्यमांवर फज्जा झाला होता. त्यामुळेच श्री सदस्यांच्या मनातील आप्पासाहेब धर्माधिकारींचं स्थान पाहून सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी उपयोग करायचा होता याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एकूण सत्ताधाऱ्यांच्या राजकीय भुकेमुळे निष्पाप श्री सदस्यांना जीव गमवावा लागला आहे हे देखील सत्य आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 11 Shri Sadasya Dead in Navi Mumbai Maharashtra Bhushan Puraskar Program check details on 17 April 2023.

हॅशटॅग्स

#11 Shri Sadasya dead(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x